जनतेज न्युज

अशोक गेहलोत सरकार बरखास्त करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडे मागणी

प्रतिनिधी, धुळे : राजस्थान राज्यातील उदयपूर येथे १० दिवसांपूर्वी नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यामुळे कन्हैयालाल तेली या ४० वर्षीय व्यक्तीची कट्टरतावादी मुसलमानांकडून हत्या करण्यात आली होती.
कन्हैयालाल तेली हे शिवणकाम करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्या दुकानात घुसून मुसलमानांनी तलवारीने त्यांचा शिरच्छेद केला. नंतर संबंधित धर्मांध जिहादी लोकांनी या हत्येचे दायित्व घेत असल्याची पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली, तसेच त्यांनी या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रसारित केला. तसेच देशाचे प्रधानमंत्री यांची सुद्धा अशीच हत्या करू असे या धर्मेंद्र जयदींनी व्हिडिओ बनवून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केला त्याची माहिती समोर येत आहे.या घटनेचे पडसाद धुळे शहरात देखील उमटले आहे भारतीय जनता पक्ष व हिंदू जनजागरमंचच्या वतीने आज धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र होऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला व संबंधित गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई करा. तसेच राजस्थान मधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारचा देखील निषेध यावेळी करण्यात आला.अशोक गेहलोत सरकार बरखास्त करा.
पैगंबर वादात एका हिंदू टेलरची हत्या केल्या प्रकरणी धुळ्यातील हिंदू संघटनांनी राजस्थान मधील काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उदयपूरमधील या भ्याड घटनेला अशोक गेहलोत सरकार जबाबदार असून या सरकारने करौली दंगलीतील मुख्य दंगलखोरांना खुलेखाम सोडले. टोंकमध्ये मौलानाने हिंदूंचे गळे कापण्याची धमकी दिली होती, परंतु सरकार कडून कारवाई झाली नाही. हा मारेकरी व्हिडिओ बनवून हत्याकांडाच्या धमक्याही देत ​​राहिला, पण गेहलोत सरकार गप्प बसले. याचाच अर्थ असा की गेहलोत सरकार मारेकऱ्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे आमची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विनंती आहे की, अशोक गेहलोत सरकार बरखास्त करा कारण राजस्थान मध्ये वेळोवेळी हिंदूंची गळचेपी करण्याचे काम करीत आहे. गेहलोत सरकार बरखास्त करून देशात चांगला संदेश द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.