प्रतिनिधी, औरंगाबाद : रंगाबाद विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार हरवले आहेत. कायद्याच्या परिभाषेत लोकसेवक असलेले लोकप्रतिनिधी मतदार क्षेत्रातच काय; पण राज्यात देखील नसल्याचे वृत्तपत्रांच्या बातम्यांमधून समजले. लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघ अथवा विधानसभा त्यांचे कार्यक्षेत्र आहे. याशिवाय त्यांना इतरत्र कुठे जायचे असेल तर त्यासाठी त्यांनी आवश्यक ती कारवाही पूर्ण करून राजा घेऊन जाणे अपेक्षित आहे. मतदार संघातील जनतेची गाऱ्हाणी ऐकून त्यावर शासन दरबारी तोडगा काढण्याची तसेच इतर घटनात्मक कामकाजाचे जबाबदारी टाळून लोकप्रतिनिधी पंचतारांकित राजकीय खेळ खेळण्यात व्यस्त असल्याचे समजले. आम्ही भारताचे नागरिक आणि मतदार या नात्याने लोकप्रतिनिधींच्या कामकाजाबाबत जागरूक असल्या कारणाने घटनेतीलकलम ५१ अ नुसार संविधानाचे पालन करणे आणि त्यातील आदर्श संस्थांचा सन्मान करणे, मानवतावाद, चौकस नागरिकत्व सुधारण्याचा सुधारण्याची भावना विकसित करणे या अशा तरतुदींचे पालन करत समाजातील सर्व सदस्यांच्या सन्मानाच्या पायावर लोकांच्या स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे हे मूलभूत अधिकारांचे उद्दीष्ठय जाणून तक्रार करीत आहोत. घटनात्मक हक्क देणे हे व्यवस्थेचे कर्तव्य असून त्यासोबत नागरिकांच्या हक्काचे रक्षण करत कर्तव्य बजावणे हे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. जनतेचे प्रिय (?) आमदार आणि लोकप्रतिनिधी हरवले असून त्यांचा शोध घेऊन त्यांना उर्वरित काळासाठी परत जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी पोलीस प्रशासन म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडावे. त्यांचा शोध घेऊन त्यांना विधानसभा सदस्य म्हणून घेतलेल्या शपथेची आठवण करून द्यावी.
