जनतेज न्युज

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणा-या वारकऱ्यांसाठी अखंड अन्नछत्र आणि प्रथमोपचार केंद्राची उभारणी

प्रतिनिधी, बीड : मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ या विभागातील अनेक दिंड्या बीड मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. आणि याच दिंड्यातील वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था, मागील चार वर्षांपासून बीड जिल्हा व्यापारी महासंघ आणि पाली ग्रामस्थांच्या वतीने केला जातोय. मागील दोन वर्षांत कोविडमुळे या सेवेत खंड पडला होता. यंदा मात्र पंढरपूरकडे जाण्यासाठी वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्यातील वारकऱ्यांना इथे विसावा मिळतो. यंदा भोजनासह वारकऱ्यांसाठी इथे प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आलंय. विठू नामाचा गजर करत वारकरी भोजनाचा आस्वाद घेत आहेत.