प्रतिनिधी, यवतमाळ : बीजेपीच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी पैगंबर मोहम्मद यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या एका हिंदू इसमाची धर्मांधांनी निर्घृण हत्या केली. देशात हिंदूवरील वाढत्या हिंसाचाराच्या निषेधार्थ हिंदू संघटना विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती, दुर्गावाहिनी, बजरंग दल तर्फे पुसद येथील महात्मा गांधी चौकात आतंकवादाच्या प्रतीकात्मक पुतळ्याच्या दहन करण्यात आले. यावेळी कन्हैया भैया अमर रहे आतंकवाद मुर्दाबाद, भारत माता की जय घोषणाबाजी करून उदयपूर घटनेच्या तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हा मंत्री बालाजी कामिनवार, नगरमंत्री हरीश चौधरी, माजी अध्यक्ष शंकरराव पांडे, शिवराज देशमुख, करन मखरे, अष्टविनायक मुखरे, विनोद जिल्हेवार आदी उपस्थित होते.
