प्रतिनिधी, जालना : येणाऱ्या काळातील सर्व सण व उत्सव सर्वांनी शांततेने साजरे करावेत असे आवाहन जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी येथे केले. ते शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते.
10 जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त शहरातील शोभा प्रकाश मंगल कार्यालयात शांतता कमिटीच्या बैठकीचे शनिवारी(दि. 2) आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीस नगर पालिकेचे प्रशासक संदीपान सानप, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, कदीम जालनाचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. के. नाचण, सदर बाजार पोलीस ठाण्याचे ज्ञानेश्वर पायघन आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलतांना ते म्हणाले की, सणांना कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पोलीस प्रशासन आपल्या बरोबर आहे. सर्व नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. काही अनुचित घटना घडत असतील त्याची माहिती पोलिसांना द्यावी, त्यावर प्रशासनाकडून नक्कीच तात्काळ दखल घेतल्या जाईल असे यावेळी पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे म्हणाले.यावेळी बैठकीस शहरातील प्रतिष्ठीत नागरिक ,नगरसेवक, कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बैठकीस शहरातील प्रतिष्ठीत नागरिक ,नगरसेवक, कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
