जनतेज न्युज

आषाढी एकादशीनिमित्त जालना जिल्ह्यातून प्रत्येक आगारातून वाढीव बसेस सोडण्यात आले आहे

प्रतिनिधी , जालना : आषाढी एकादशीनिमित्त जालना जिल्ह्यातून प्रत्येक आगारातून वाढीव बसेस सोडण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे एखाद्या गावातून 45 प्रवासी झाले तर थेट गावांमधून बस पंढरपूरसाठी पाठवली जाईल. त्यासाठी संबंधित आगार प्रमुखाशी संपर्क साधावा असे अवाहन दि,4 सोमवार रोजी जालना आगार प्रमूख चव्हाण यांनी केले.  त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातून एकूण 175 जादा बसेस सोडण्यात येत असल्याचे जालना आगार प्रमुख चव्हाण यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. यामध्ये जालना आगारातून 40 अंबड येथून 40 परतुर आगारातून 20 आणि जाफराबाद आगारातून 25 असे एकूण 125 गाड्या जिल्ह्यातून पंढरपूरसाठी पाठविण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे प्रवाशांची संख्या वाढली तर जळगाव आगारातून पुन्हा 50 गाड्या मागवण्यात येत आहेत. अशा एकूण 175 बसेस पंढरपूर साठी तयार आहेत अशी माहिती जालना आगार प्रमुख चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.