प्रतिनिधी , मुंबई : पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा आज पालिका मुख्यालयात संपन्न झाली,असून यात अनेक विषयांना सर्वानुमते मंजूर देण्यात आली आहे.यात प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र,खारघर आणि इतर पालिका हद्दीतील पायाभूत सुविधा देणे यावर भर देण्यात आला असून या सगळ्या कामाचे टेंडर लवकरच निघणार आहेत आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सांगितले,एकूण 7 मोठ्या कामांना मंजुरी दिली असून याची अंमलबजावणी लवकर होणार असल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.
