प्रतिनिधी, रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निषाणा साधला आहे.रिक्षाच्या स्पीड पेक्षा मर्सिडीजचा स्पीड फिका पडला आहे.यावर बोलताना शिवसेना सचिव म्हणाले कि एकनाथ शिंदे यांची विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल कुणीतरी लिहून देतं म्हणून ट्वीट करायच स्व:तच्या हातान ट्वीट करता येत का हा अभ्यास करावा लागेल.एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थिमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली त्याचा पश्चाताप होतो आयुष्यातील मोठ पाप झालय.मी सांगितलं नसत तर एकनाथ शिंदेना आमदारकी मिळाली नसती अस राऊत यांनी सांगितले.महाराष्ट्रातल्या गावांना ओळखणारा एकमेव नेता म्हणजे उध्दव ठाकरे आहेत. राष्ट्रपती निवडूकीसाठी भाजपला पाठींबा पत्र. राष्ट्रपती निवडणूकीसाठी भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठींबा द्यावा असं राहूल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलय या पत्रामुळे पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलय. लेखी पत्र देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटूनही सांगता आलं असतं त्यांचे दरवाजे उघडे होते.असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटल शिवसेनेचे 39 आमदार शिंदे गटात सामिल झाले आता खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे 18 पैकी 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत तर 22 माजी आमदार देखील संपर्कात असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी तुमच्या कोणावर जबरदस्ती करणार आहे जे मनापासून माझ्याबरोबर आहेत त्यांनी माझ्यासोबत राहा तुमचं दुसरीकडे भविष्य उज्वल असेल तर जरूर जा..एवढ्या मोठ्या मनाचा नेता आम्हाला लागला यातच आम्हाला समाधान असल्यास राहू त्यांनी म्हटलं.
