प्रतिनिधी, जळगाव : राजस्थानातील जयपूर शहराजवळील लहान गावात राहणारे ये बहुरूपी कलाकार चोपडा शहरात गेल्या पन्नास वर्षापासून येत आहे ही त्यांची सहावी पिढी आहे चोपडा शहरात येऊन वेगवेगळे रूप धारण करून शहरात आपली कला सादर करीत असतात संपूर्ण कला सादर झाल्यानंतर शेवटच्या दिवशी गावात फिरून जो जे दिल ते समाधानाने घेऊन आपल्या गावी प्रवास करीत असतात कोरोनाचे दोन वर्ष खूप वाईट गेले शासनाकडून जेवणाची व्यवस्था झाली परंतु आर्थिक मदत काही न मिळाली नागरिकांनी आर्थिक मदत केली ही कला कालबाह्य होऊ नये व आपली संस्कृती टिकून राहावी यासाठी आजोबा वडील यांच्यापासून ही परंपरा पुढे कायम ठेवत आहोत चहाची हॉटेल टाकून पाचशे रुपये रोजाला कमवू शकू परंतु ही कला आपली संस्कृती आहे बहुरूपी वेगवेगळ्या रूप धारण करून नागरिकांना त्याची ओळख करून देत असतो व ही कला सादर करीत असतो सरकारकडून असे कलाकारांना मदत मिळावी अशी अपेक्षा या वेळी बहुरूपी कलाकारांने व्यक्त केले.
