प्रतिनिधी , ठाणे : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा त्यांच्या ठाण्यात दाखल होत आहेत आणि त्याच पार्शवभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी ठाण्यात जय्यत तयारी झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आणि एकनाथ शिंदे ठाण्यात ज्या ज्या ठिकाणी भेट देणार आहेत त्या त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने आले आनंद दिघे याच्या शक्ती स्थळ या ठिकाणी अभिवादन करणार त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे याच ठिकानी शक्ती स्थळ या ठिकाणी फुलांनी आरास सजवलेली असून रोषणाई करण्यात आलेली आहे . त्यानंतर आनंद मठ कडे गेले
