जनतेज न्युज

बुलडाण्यात दमदार पाऊस सुरू

प्रतिनिधी, बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबई, कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. तर काही ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मात्र असे असले तरी वाहतूक सुरळीत सुरू आहे.बुलडाणा शहरात काल रात्री दमदार पाऊस झाला होता.सकाळी थोडी विश्रांती घेऊन पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे.