जनतेज न्युज

खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

प्रतिनिधी, ठाणे : सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू. घोडबंदर रोड वरील काजूपाडा या ठिकाणी खड्ड्याच्या पहिला बळी गेल्यानंतर या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी यंत्रणा आणि पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.संभाव्य आपत्ती संदर्भात सतर्क राहण्याचा सूचना देण्याबरोबरच त्वरित खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक सुरू असून या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत .जिल्ह्यातील सहा महापालिकांसोबतच कोकण पट्ट्यातील सर्व यंत्रणांचे अधिकारी या बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित आहे.मुंबई तसेच ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम असून संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांची ही बैठक सुरू आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक.राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ठाणे जिल्हा आणि शहराशी निगडित विविध यंत्रणांचे, विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित. अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर काम करण्याच्या सूचना द्या. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर काम केल्यास चांगल्याप्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते. खड्डे लक्षपूर्वक भरा. खड्ड्यांमुळे अपघात होऊन कुणी जखमी होऊ नये याची दक्षता घ्या. कोल्ड मिक्स पद्धतीने खड्डे भरा. रस्ते दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणानी याबाबत काळजी घ्यावी. पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून रहा. पूर येणाऱ्या भागात जिवीतहानी होऊ नये याची दक्षता घ्या. लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी ठेवा आणि आवश्यकता पडल्यास वेळेत हलवा. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्याभागातील लोकांना सावध रहाण्याची सूचना द्या. सुरक्षित स्थळी लोकांची जी व्यवस्था करायची ती चांगलीच करा. राहण्याची – जेवणाची चांगली व्यवस्था करा. रेल्वे बरोबरही चांगले समन्वय ठेवा. तिन्ही धरणाच्या क्षेत्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवा. ज्या गावांचे स्थलांतर रखडले आहे ते तातडीने करा. विशेषतः सावळसे गावाला जागाही दिली आहे. या गावाबाबत सर्व यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. रेल्वेच्या यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना. मुंबई महापालिकेशी समन्वय राखावा. पाणी साचून सेवा विस्कळित झाल्यास प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी घ्या. यासाठी एक समन्वयक अधिकारी ( नोडल) नियुक्त करावा. प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्ट, एसटी बसेस किंवा स्थानिक परिवहन सेवा यांची मदत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी लोकांना माहिती देण्याची व्यवस्था करा. संपर्क आणि समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करा.