जनतेज न्युज

एक दिवस असा येईल की महागाईच्या विरोधात सर्वसामान्य जनता पेटून उठेल – बाळासाहेब थोरात

प्रतिनिधी, अहमदनगर : सत्तेचा उपयोग हा गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केला आहे. पक्ष नेतृत्वाच्या विश्वासामुळे देश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. राज्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहोत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिमत्व सरळ आहे. त्यांनी अनेक वेळा विश्वास टाकला यातून महाविकास आघाडी सरकार मधून सर्वसामान्यांसाठी मोठे निर्णय घेता आले .सत्ता येते जाते. जनतेची कामे करणे महत्त्वाचे असते. आगामी काळामध्ये प्रगतीपथावर असलेल्या सर्व सहकारी संस्थांची गौरवास्पद वाटचाल अशीच सुरू ठेवून सर्व निवडणुका एकजुटीने एकत्रित लढून मोठे यश संपादन करणे महत्त्वाचे आहे.याकरता सर्वांनी एकत्रित रहावे आपल्यामध्ये मनभेद करणारे काही येतील. त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवा. जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढेल आणि जिंकेल याकरता आपण सर्वांनी कटिबद्ध राहावे असे आवाहनही त्यांनी केले.