जनतेज न्युज

शिरपूर पोलिसांनी तब्बल 19 लाखांचा गुटखा केला जप्त

प्रतिनिधी, धुळे : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेत शिरपूर पोलिसांना मोठे यश आले आहे, मध्यप्रदेश मधून येत असलेला 19 लाखांचा गुटखा शिरपूर पोलिसांनी हस्तगत केला आहे.मध्यप्रदेश मधून महाराष्ट्राकडे येत असलेला गुटखा मुंबई आग्रा महामार्गावरून येत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड यांना मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर आपले शोध पथक तैनात करून येणाऱ्या सर्व गडांवर लक्ष ठेवून होते. याचवेळी MH 18 BG 8647 या वाहनावर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी वाहन बाजूला घेण्यास चालकाला सांगितले चालकानी त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल राहिला.
पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवा उडवी चे उत्तर देऊ लागला वाहनात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विमान पान मसाला, विमल तंबाखू, रजनीगंधा, तुळसी, जाफरा आणि जादा आदी प्रकारचा गुटखा आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात डीवायएसपी अनिल माने यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात भेट देऊन अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती जाणून घेतली.
या घटनेची कारवाई करीत असताना शिरपूर पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात माहिती देऊन अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक किशोर बाविस्कर यांना शिरपूर पोलीस ठाण्यात बोलावून घेत ताब्यात घेण्यात आलेला गुटख्याची रक्कम निश्चित केली. या संपूर्ण कारवाई मध्ये पोलिसांनी वाहनासह 19 लाख रुपयांचा गुटखा आणि दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पुढील कारवाई करीत आहे.