प्रतिनिधी , बुलडाणा : नोटीस बजावली ती एक औपचारिकता आहे..त्यांनी आमच्या 40 आमदारांना नोटीस पाठवली ती बेकायदेशीर आहे..आम्ही त्या 16 लोकांना व्हीप बजावला तो कायदेशीर आहे. या कायदेशीर बाबी तपासल्यानंतर विधानसभे च्या नियमाप्रमाणे कोणाचा व्हीप मानवा आहे.. तीन गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या तीन गोष्टी संदर्भात एक गोष्ट सुप्रीम कोर्टात राहणार आहे..आणि दोन गोष्टी चा विधानसभेमध्ये कायदेशीर बाबी तपासल्या जातील.. आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या त्या 40 आमदारांवर काही कारवाई होऊ शकत नाही.जी मने तुटली ही म्हणे कशी जोडणार आता.. त्यामुळे या गोष्टीला खूप उशीर झाला आहे असे मला वाटते.निष्ठा यात्रेला आम्ही मनापासून शुभेच्छा देऊ. आपला पक्ष वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रत्येक पक्षाचा प्रमुख किंवा पदाधिकारी तशा प्रकारची संघटन बांधणी करत असतात त्यांनी ती करावं. आम्ही कोणतेही अडचण निर्माण करणार नाही अशी ही प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.
