प्रतिनिधी, औरंगाबाद : भारतात सोशल मीडिया म्हटलं तर नुसता शुभेच्छा, अभिनंदन व श्रद्धांजलीचा वर्षाव मात्र सिल्लोड येथे काही समाजसेवीवृतीच्या व्यक्तींनी एकत्र येत व्हाटसअप गृपच्या माध्यमातून शहरातील विविध दवाखान्यातील रुग्ण व त्याचे नातेवाईकासाठी मोफत जेवणाचा डबा पुरविला जात आहे. गेल्या काही वर्षापासून “अवघे विश्वची माझे घर” या उक्तीप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून जग हे जवळ आले आहे. प्रत्येक जन आपल्या भावना यावर प्रकट करीत आहे. मात्र सिल्लोड शहरात काही समाज सेवी वृतीच्या व्यक्तींनी एकत्र येत व्हा टस अप ग्रुपच्या माध्यमातून शहरातील विविध दवाखान्यातील दाखल झालेल्या रुग्ण व त्याच्या नातेवाईकास मोफत जेवणाचा डबा पुरविला जात आहे. तयार करण्यात आलेल्या व्हात अप ग्रुपवर शहरातील विविध दवाखान्यात आज रोजी किती रुग्ण व त्याचे नातेवाईक थांबले आहे याची सविस्तर माहिती दवाखान्याचे व्यवस्थापन संबंधित व्हातस अप ग्रुपवर माहिती देतात. दुपारी 2 वाजेपर्यंत व रात्री ९ वाजेपर्यंत थांबलेल्या रुग्ण व नातेवाईकाची संख्या नेमलेल्या खानावळी (मेस) वाल्याना दिली जाते. त्या नंतर खानावळ वाला डब्बे तयार करून संबंधित रुग्ण व त्याच्या नातेवाईकास नेवून देतात.
