प्रतिनिधी, औरंगाबाद : शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता याला आज एम आय एम काही मुस्लिम गटांना एकत्र करून मूक मोर्चा काढून निषेध करत आहे. यावरून लक्षात येते की एमआयएम ही औरंगजेब यांच्या विचारायची असून, ज्या औरंगजेबने हिंदूंचे मंदिरे तोडली, धर्मवीर संभाजी महाराज यांचे हाल करून वध केला. आशा औरंगजेब चे नाव शहराला कशासाठी संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणारा एम आय एम चा आम्ही निषेध करतो.खासदार इम्तियाज जलील ही राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हा विरोध करत असल्याचाही आरोप त्यांनी आज रोजी माध्यमांशी बोलताना केला आहे.औरंगाबाद शहराच्या नामांतरासाठी मतदान घेण्यावरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे म्हणाली की खासदार जलील हे काय पंतप्रधान किंवा राष्ट्रपती आहे का की त्यांनी मागणी केली म्हणून ती पूर्ण करावी, असा टोलाही आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना खासदार इम्तियाज जलील यांना लगावला आहे.
