प्रतिनिधी, नवी मुंबई : आज सकाळी एपीएमसी वरून वाशीला जाणाऱ्या कारचा अपघात झालाय. जोरदार पाऊस सुरू असल्याने कोपरी सिग्नल जवळ वाहन चालकाचा कार वरील ताबा सुटला आणि कार थेट नाल्यात कोसळण्याची घटना घडली. नाल्याला सौरक्षक भिंत नसल्यामुळे आणि पाऊसही जोरदार पडत असल्याने कार चालकाला रस्त्याच्या अंदाज न आल्याने कार थेट नाल्यात कोसळली. वरना कंपनीची कार असून वाहन चालकाने प्रसंगावधान साधत दुर्घटनेनंतर तात्काळ वाहनातून बाहेर आल्याने कोणतीही हानी झाली नाही. सध्या नाल्यात पडलेली कार बाहेर काढण्यात येत आहे.
