प्रतिनिधी, नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील वावंजे परिसरात एका दरीत पडलेल्या म्हशीच्या वासरा ला स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचवलं आहे. या थरारक रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation)चा व्हिडिओ समोर आला असून यानंतर या धाडसी तरुणांचं कौतुक होत आहे. मलंगगडाच्या मागच्या बाजूला असलेल्या वावंजे परिसरात एका दरी (Valley) त 3 ते 4 दिवसांपासून एक गाईचं वासरू पडलं होतं. या वासराला पुन्हा वर येणं शक्य नव्हते. त्यामुळे ते तिथेच अडकून पडले होते. या घटनेची माहिती मलंगगड परिसरातील काकडवाल गावातल्या स्थानिक तरुणांना मिळाली. त्यानंतर या तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत वासराची सुटका केली.
