जनतेज न्युज

कोपरखैरणे पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला केली अटक

प्रतिनिधी, नवी मुंबई : कोपरखैरणे बस डेपो जवळ एक इसम पिस्तूलासह येणार असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोपरखैरणे पोलिसांनी कोपरखैरणे बस डेपो परिसरात दोन पथकांच्या सहाय्याने सापळा रचून एका इसमास ताब्यात घेतले. पोलिसांनी तात्काळ त्याच्या कमरेवर असलेले एक रिव्हॉल्व्हर ताब्यात घेत त्याला अटक केली. पोलीस ठाण्यात अधिक चौकशी केली असता सदर इसमाचे नाव ऋषीकेश जायभाये असून त्याच्याकडे असलेल्या आणखी 2 पिस्तुल आणि एक मोटारसायकल देखील ताब्यात घेण्यात आली. आरोपी विरोधात अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरूध्द कोपरखैरणे पोलीस ठाण्यात यापुर्वी तीन गुन्हे दाखल आहेत.