जनतेज न्युज

मुख्यमंत्र्यांच्या पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी करण्याच्या निर्णयावर नागरिकांच्या प्रतिक्रिया

प्रतिनिधी, औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आज मुख्यमंत्र्याने पेट्रोल डिझेलचे अनुक्रमे पाच आणि तीन रुपयांनी स्वस्त केले आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद मध्ये मात्र नागरिकांच्या काहीशा संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. जास्त रुपयाने वाढवायचं आणि दोन-तीन रुपयांनी स्वस्त करायचं यात कसला भाव कमी असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. जे काही दिवसांपूर्वी पेट्रोलचे भाव कमी करा म्हणणारे आज सत्तेत आल्यावर सुद्धा टॅक्स काढून आणखी दर कमी करता आले असते असे नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या.