जनतेज न्युज

शहरप्रमुख ठेवायचे की नाही हा निर्णय पक्षप्रमुख घेतील – विश्वनाथ भोईर

प्रतिनिधी, कल्याण : कल्याण शहराचा शहरप्रमुख म्हणून माझी नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असून मी गद्दारी केलेली नाही मी राजीनामा देणार नसल्याचा पवित्रा कल्याण पश्चिमचे आमदार व शिंदे समर्थक विश्वनाथ भोईर यांनी घेतला आहे. पक्ष प्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांना वाटले तर या पदावर मला ठेवतील अन्यथा काढून टाकतील हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच असेल असेही स्पष्ट करायला भोईर विसरले नाहीत.शिवसेना पक्षाच्या 40 बंडखोर आमदारामध्ये सुरुवातीपासूनच कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर होते. इतर आमदाराचा बंडखोरीचा प्रवास 19 तारखेपासून सुरू झाला असला तरी भोईर यांचा प्रवास 13 जून पासूनच सुरू झाला होता. बंडखोरीनंतर सत्ता स्थापन होताच 21 दिवसांनी आमदार विश्वनाथ भोईर आपल्या मतदार संघात परतले यांनातर आज त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी बोलताना त्यांनी आपण आजही शीवसैनिक असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला मिळणारी तुच्छ वागणूक आणि मतदार संघात काढल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल यासारखी वक्तव्ये केली जात होती. यामुळेच महाविकास आघाडीतून बाहेर पडन्याच्या मुख्यम्नात्री एकनाथ शिंदे यांना आपण पाठिंबा दिला असून आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक असताना जर आम्हाला गद्दार ठरवले जाणार असेल तर गद्दारीची व्याख्या सविस्तर पणे मांडली जावी अशी मागणी देखील त्यांनी केली.तर कल्याण पश्चिमेच्या आमदार पदी नियुक्ती झाल्यानंतर ही आमदार भोईर हेच शहरप्रमुख असून आता झालेल्या घडामोडीनंतर या पदाचा राजीनामा देणार का ? या प्रश्नावर उत्तर देताना मी गद्दारी केली नाही मी राजीनामा देणार नाही जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असे स्पष्ट करायला ते विसरले नाहीत. दि बा पाटील विमानतळ नामकरण तत्कालीन मुख्यम्नात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरुन उतरताना घाई घाईने घेतलातर दि बा पाटील यांचे विमानतळाला नाव देण्याच्या प्रस्तावाला नव्या मंत्रिमंडळाने स्थगिती दिल्याच्या निर्णयावर बोलताना त्यांनी तत्कालीन मुख्यम्नात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरुन उतरताना त्यांनी हा निर्णय घाई घाईने घेतला असून मुळात हे मंत्रिमंडळच वैध नसल्याने हा निर्णय वैध होता असे म्हणता येणार नाही त्याला रीतसर मान्यता देण्यासाठी या मंत्री मंडळाने हा निर्णय घेतला असावा मात्र आगरी समाजाचा आमदार म्हणून विमानतळाला दि बा यांचेच नाव असावे यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दि बा पाटील नामांकरण प्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून उतरताना घाई घाईने घेतला असून ते मंत्रिमंडळ वैद्य आहे की अवैध आहे हे अजूनही ठरले नाही. राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर जायला नको या साठी आमचा पहिलाच विरोध होता.मात्र मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख विराजमान होणार म्हणून माघार घेतली होती .महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आम्हाला गद्दार ठरवत असेल तर गद्दारींची व्याख्या काय आहे ती जाहीर करावी. मी मंत्रिमंडळाबद्दल काही सांगितलं नाही एकनाथ शिंदेंना वाटलं तर मंत्रीपद देतील.