प्रतिनिधी, बुलडाणा : ऋतूमानानुसार आपल्याकडे आहार-विहारावर परिणाम होतो. हिवाळ्यात उबदार कपडे, तर पावसाळ्यात रेनकोट घालून पावसात भिजण्यापासून बचाव केला जातो. मात्र वातावरणातील गारव्यामुळे अंतर्वस्त्रेही वाळत नाहीत. तेव्हा तसेच अंतर्वस्त्र घातल्यास फंगलचा त्रास बळावू शकतो. न वाळलेली अंतर्वस्त्रे वापरल्याने त्याठिकाणी फंगल तयार होऊन त्वचारोग बळावण्याची शक्यता असते.हे प्रमाण पावसाळ्यात अधिक वाढत असते. अंगावर ओले कपडे ठेवू नये. बाहेर पडणे आवश्यकच असेल, तर रेनकोट किंवा छत्रीचा वापर करावा. फंगलवर सुरुवातीच्या काळातच न नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. पावसाळ्यात ओले कपडे वापरूच नका. तसेच ओले झालेले जोडे अधिक वेळ पायात ठेवू नका, ते लगेच बदला. कारण ओल्या कपड्यांमुळे सर्दी होऊन आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय त्वचेचे इन्फेक्शन होण्याची संभावना असते.
फंगल म्हणजे काय ?
फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) हा असा संसर्ग आहे, जो संपूर्ण जगात आढळून येतो. जेव्हा एखादी बाह्य बुरशी शरीरातील एखाद्या विशिष्ट भागावर जमा होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्याशी सामना करण्यास सक्षम नसते, तेव्हा ही समस्या उद्भवते. त्वचारोग हा काहीअंशी संसर्गजन्य असू शकतो; मात्र अनुवंशिक नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. केवळ वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे.हे करावे
सुती कापडापासून बनविलेली सैल अंडरवेअर घालण्यास सुरुवात करावी संक्रमित लोकांच्या संपर्कात येणे टाळा.वापरलेल्या वस्तू जसे की, टॉवेल, चादर आदींचा वापर करावा.
हे करू नये – फंगलला ओलसर आणि उबदार वातावरणात राहणे पसंत असते. त्यामुळे हा तो शरीराच्या अशा भागावर जास्त पसरतो, जिथे ओलसर आणि उबदारपणा मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे त्वचा ओली राहू देऊ नका.
