जनतेज न्युज

आम आदमी पार्टीने आज पिंपरी मेघे येथील शिक्षक कॉलनी येथे रस्त्यासाठी आंदोलन

प्रतिनिधी, वर्धा : आज आम आदमी पार्टीने आज पिंपरी मेघे येथील शिक्षक कॉलनी येथे रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन युवा सचिव आम आदमी पार्टी संदीप डंभारे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आले. गेल्या १५ ते १८ वर्षापासून या कॉलनी मध्ये रस्ता नसल्याने आज अखेर आप ने आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला. सततच्या पावसामुळे या रस्त्याने चालणेही अवघड झाले असून शाळेकरी मुलांना घ्यायला येणारी ऑटो सुध्दा या रस्त्याने येऊ शकते नाही इतकी दयनिय अवस्था या रोडची झाली आहे. सामान्य नागरिकही यावेळी या आंदोलनात आम आदमी पार्टी सोबत रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. यावेळी आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.