प्रतिनिधी, कल्याण : देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने मागील वर्ष विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. 15 ऑगस्ट रोजी अमृत महोत्सवाची सांगता देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर झेंडा फडकवून करावी असे आवाहन पालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी केले आहे. नागरिकांना 20 रुपये किमतीत हे झेंडे पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
Viअमृत महोत्सवी वर्षांनीमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “हर घर तिरंगा” ची घोषणा केली आहे. या आदेशाचे पालन करताना पालिका प्रशासनाने शहरातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. सूर्योदयापासून सुर्यास्ता पर्यत धवज फडकवून संध्याकाळी सन्मान पूर्वक धवज उतरवावा. आणि तिरंग्याचा सन्मान राखावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पालिका प्रशासनाकडून धवज स्वयंसेवक नेमण्यात आले असून त्यांच्या मार्फत 2 लाख 10 धवज उपलब्ध करून दिले जाणार असले तरी नागरिकांना हे झेंडे 20 रुपये किमतीत विकत घयावे लागणार आहेत. नागरिकांनी देशाचा तिरंगा सन्मानपूर्वक विकत घ्यावा आणि तो आपल्या घरावर फडकत ठेवत अमृत महोत्सव साजरा केला जावा अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे
