जनतेज न्युज

आठ दिवसात खड्डे भरले नाही तर हजारो रिक्षचालकांसह महापालिका कार्यालयावर काढणार भव्य मोर्चा

प्रतिनिधी, कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात खड्डयांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. बहुतांश चाकरमानी हे रिक्षाने प्रवास करतात. या खड्डयांमुळे रिक्षाचालक देखील हैराण झाले आहेत. अपघात होत आहेत. नागरिकांचे जीव जातायेत तरीही प्रशासन ढिम्म असल्याने अखेर आज सुमारे 200 रिक्षाचालक केडीएमसीच्या ह प्रभाग कार्यालयावर धडकले.. प्रवासी भाडे न घेता आज रिक्षाचालकांनी मोर्चा काढून अधिका-यांना धारेवर धरलं.. डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा, जुनी डोंबिवली, नवापाडा आदी रस्त्यांवर तर खूप खड्डे पडले असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्या रस्ते हे समजन मुश्किल झालंय.. रिक्षाचालकांनी मोर्चा काढून ह प्रभाग अधिकारी प्रमोद पाटील आणि कार्यकारी अभियंता महेश गुप्ते यांना चांगलेच धारेवर धरले. अखेर येत्या आठवड्याभरात रस्त्यावरील खड्डे भरले जातील असे आश्वासन महपालिका अधिकाऱ्यांनी रिक्षचालकांना दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आठ दिवसात दरम्यान येत्या आठ दिवसात हे खड्डे भरले नाही तर महापालिका कार्यालयावर हजारो रिक्षचालकांसह भव्य मोर्चा काढला जाईल असा इशारा संघटनेचे पदाधिकारी भगवान मोरजकर यांनी सांगितले. तर याबत बोलताना पालिका आयुक्तांनी प्रत्येक प्रभागात खड्डे भरण्यासाठी एक टीम कार्यरत केली असून गेल्या चार पाच दिवस पाऊस खूप पडल्याने खड्डे बुजवायला अडचणी येत होत्या मात्र लवकरात लवकर हे खड्डे बुजवले जातील असे सांगितले