जनतेज न्युज

आमच्या मनात उध्दव साहेबांसाठी आदर कायम राहणार – उदय सामंत

प्रतिनिधी, पुणे : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणून 18 जुलै रोजी पुणेकरणाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि आम्ही घेतलेल्या भूमिकेला पुण्यातील कार्यकर्त्यांकडून मोठे समर्थन मिळत आहे आणि
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचे असेल तर त्याबाबत शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. असे मत शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केले.उदय सामंत आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी सामंत म्हणाले की, होय आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत, पण हे जे काही नगरसेवक आमच्यासोबत येताहेत ते शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी आमच्यासोबत येत आहेत. रत्नागिरीतही 18 नगरसेवक मला भेटले आणि त्यांनी शिंदे साहेबांच्या भूमिकेला समर्थन दिल आहे.माझी आज काही पिंपरी चिंचवड येथील नागरिकांसोबत चर्चा झाली. याचा अर्थ शिवसेना फुटली असा होत नाही. तसेच कुणाला कोणते पद द्यायचे याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे. तसेच विरोधकांच्या टिकेवरून एकनाथ शिंदे यांचं भाजपकडून खच्चीकरणं होतय अस मला वाटत नाही. माइक आणि चिठ्ठिबाबत उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः खुलासा केला आहे.पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सामंत म्हणाले की, आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत, आम्ही फक्त शिंदे साहेबांच्या भूमिकेचं समर्थन करतोय. तसेच विनायक राऊत हे माझ्या वडिलांसारखे आहे. विनायक राऊत यांनी कितीही टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार नाही कारण ती आपली संस्कृती नाही. शिवसेना प्रवक्ता दीपक केसरकर आणि राणे यांच्या होणाऱ्या टिके बाबत सामंत विनोदाचा रंग दिला. सिंधुदुर्ग ही मनोरंजन नगरी असल्याचे सामंत म्हणाले आहेत. आमच्या या उठावात एकनाथ शिंदे यांनी एकदा ही सांगितले नाही की, मला शिवसेना बळकवायची आहे किंवा शिवसेनेचा धनुष्यबाण मला ताब्यात घ्यायचा आहे. मला पक्षप्रमुख होयचे आहे. असा कोणताही गैरसमज करु नये. उध्दव साहेबांसाठी आदर जो काल आमच्या मनामध्ये होता तो आज ही आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे.