प्रतिनिधी, वाशिम : राज्यात काल 17 जुलै रोजी नीट चा पेपर घेण्यात आला. त्यात हजारो विद्यार्थ्यांनी पेपर दिला. मात्र वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर हिजाब व बुरखा घातलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला असल्याचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती.मात्र हे सर्व आरोप महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नाकारले असून आमच्या परीक्षा केंद्रावर पाच मुली बुरखा घालून आल्या होत्या त्यापैकी तीन मुली ह्या वेळेआधी परीक्षा केंद्रावर आल्या त्याची व्यवस्थित तपासणी होऊन त्यांना परीक्षा हॉल मध्ये सोडण्यात आलं मात्र दोन मुली थोड्या उशिरा आल्याने त्यांच्या तपासणीत वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांना बुरखा काढून परीक्षेस बसण्यास सांगितलं त्या सर्वांनी व्यवस्थित परीक्षा दिली. नीट कडून गाईडलाईन दिल्या होत्या त्यानुसार ही परीक्षा घेण्यात आली. महाविद्यालयाला बदनाम करण्यासाठी ही खोटी तक्रार देण्यात आली अशी माहिती प्राचार्यांनी दिली. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे नमूद आहे की, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात नीट चा पेपर घेण्यात आला होता, मात्र या विद्यार्थ्यांसह इरम मोहम्मद जाकीर व अरिबा समन गझनफर हुसैन यांच्या सोबत केंद्रातील प्रशासकीय अधिकारी व सदस्यांशी गैरवर्तन केले व ते म्हणाले. बुरखा काढा नाही तर कात्रीने कापावं लागेल.एवढंच नव्हे तर भर रसत्यात हिजाब व बुरखा काढायला लावला गेलं असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आलं आहे.
