प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरूच, वर्धा- वैनगंगा- उमा नद्यांनी सोडले पात्र, शहरालगतचे इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे 0.50 मिटर्सने उघडले, यामुळे इरई नदीत पाणीपातळी वाढून शहराच्या सखल भागातील पूरस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे, पुराचे ताजे संकट चिमूर शहरातुन पुढे आले आहे, संततधार पाऊस आणि उमा नदीने पात्र सोडल्याने चिमूर शहराच्या सखल भागात शिरले पुराचे पाणी, टेलिफोन एक्सचेंज- तहसील कार्यालय,माणिकनगर या भागात पुराची तीव्रता अधिक आहे, चिमूरला सध्या बेटाचे स्वरूप आले आहे, चिमूर ते वरोरा आणि चिमूर ते कांपा हे मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले आहेत. संततधार पाऊस आणि उमा नदीने पात्र सोडल्याने चिमूर शहराच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. टेलिफोन एक्सचेंज- तहसील कार्यालय,माणिकनगर या भागात पुराची तीव्रता अधिक आहे. चिमूरला सध्या बेटाचे स्वरूप आले आहे. चिमूर ते वरोरा आणि चिमूर ते कांपा हे मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले आहेत. प्रशासन पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सक्रिय झाले आहे.
