प्रतिनिधी, नागपूर : नागपूरच्या दाभा परिसराचा न्यू-शांती ले-आऊट, मडावी ले-आऊट हा गोरेवाडा जंगलची भिंती काही अंतरावर आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या परिसरातच वास्तव्यास असल्याची माहिती आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या वसाहती मध्ये फिरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. दाभा परिसरात बिबट्याची दहशत असल्याची माहिती वनविभागाला असताना ठोस उपाययोजना वनविभाग कायमस्वरुपी का करीत नाही, असा सवाल ही उभा होत आहे. गोरेवाडा जंगलातून मानवी वसाहतीकडे वन्यप्राणी धाव का घेत आहेत, हा शोधाचा विषय आहे. गोरेवाडा जंगलाच्या प्रशासनाने ताबडतोब बिबट्याचा शोध घेऊन त्याला पिंजऱ्यात बंद करण्याची जवाबदारी वनविभागाची आहे.
