प्रतिनिधी, जळगाव : सध्या महाराष्ट्र राज्यात राजकीय सत्तांतर होऊन भाजप प्रणित युतीचे सरकारी विराजमान झाल्याने राजकीय व जातीवाद शक्तींना दलितांवर अन्याय करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात कोणतेही अतिक्रमण काढू नये व प्रथम पुनर्वसन करावे असे शासनाचे आदेश असतानाही जळगाव जिल्ह्यातील वाघोदे गावात दलितांच्या झोपड्या काढण्यात येत आहे. या विरोधात धुळे संविधान संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आली. यावेळी संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे यांनी बोलताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील वाघोदे गावात गेल्या 30 वर्षापासून दलित कुटुंब येथे राहते त्यांचे झोपडी अधिकृतपणे उभे असताना गावातील सरपंच गावकऱ्यांच्या मदतीने या कुटुंबावर अत्याचार करीत आहे. गावातील सरपंचासह इतर लोकांची घरे देखील अतिक्रमण भागात विना परवानगीने बांधले आहेत त्या घरांचा रस्त्यांना देखील मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो, मात्र त्यांची घरे तोडली जात नाही दलित समाजाला त्रास द्यावा या एकमेव उद्देशाने येथील सरपंच जाणून बुजून हे कृत्य करीत असल्याचा आरोप हरिश्चंद्र लोंढे यांनी यावेळी व्यक्त केला.
