प्रतिनिधी , ठाणे : कळवा पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंग, मोटार वाहन चोरीच्या गुन्हयात वाढ झाल्यामुळे वरिष्ठांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसोसिने प्रयत्न करा अशा सुचना दिल्या. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोहर आव्हाड, कळवा पोलीस स्टेशन यांनी सदर दाखल झालेल्या चैन स्नॅचिंग, वाहन चोरीच्या गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीस निरीक्षक, गुन्हे, सुदेश आजगावकर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनिरी. किरण बघडाणे, पो.उप निरी.दिपक घुगे, सपोउपनिरी मंगेश महाजन व स्टाफ यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोउपनिरी किरण बघडाणे व पथक हे कळवा पोलीस स्टेशन गु.र. नं. २८५/२०२२ भा.द.वि.क. ३९२, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोउपनिरी. मंगेश प्रल्हाद महाजन यांनी गुप्त बातमीदार याच्या मार्फत माहिती काढुन इसम नामे कलीम हारून शेख, वय-१७ वर्षे, रा. शांती मफतलाल झोपडपट्टी, कळवा पुर्व, जि. ठाणे यास दि.१६/०७/२०२२ रोजी ताब्यात घेतले. ते विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने त्याकडे अधिक विचारपुस करून त्यास विश्वासात घेवून तपास केला असता त्याने त्याच्या साथीदारा सोबत नमुद गुन्हया व्यतिरिक्त १) कळवा पो. स्टे.गु.र.नं. १६८/२०२२ भा.द.वि.क.३९२. पो.स्टे.गु.र.नं.ा ३१३/२०२२ भा.द.वि.क.३९२, ३४ अशा ०३ गुन्हयांची कबुली देवुन एकुण ०३ चैन सँचिंगचे गुन्हे उघडकीस आणुन गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १,१०,०००/-रु. कि.चे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. २) कळवा
तसेच पोउपनिरी.दिपक घुगे व स्टाफ हे कळवा पो.स्टे.गु.र.नं. १३६/२०२२ भा.द.वि.क.३७९ प्रमाणे दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाचा तपास करीत असताना पो.कॉ./२७५५ अमोल ढावरे यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेली माहिती व सी.सी. टी.व्ही फुटेजच्या आधारे इसम नामे आशिष उर्फ गल्बर कामेश्वर यादव, वय – १९ वर्षे, रा. रेल्वे पटरीच्या बाजुला, शिवाजी मार्केट रोड, भोलानगर, कळवा पुर्व, जि. ठाणे यास दि. १०/०७/२०२२ रोजी ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने त्याचा साथीदार कुणाल उर्फ अविनाश बाळु मोरे, वय-२० वर्षे, रा. सातपुर, ता.जि.नाशिक याच्या मदतीने वरील गुन्हया व्यतिरिक्त १) कळवा पो.स्टे.गु.र.नं.T ३२७/२०२२ भाद वि.क.३७९. ३४. २) कळवा पो.स्टे गु.र.नं.। १९४/२०२२ भा.द.वि. क.३७९, ३४, ३) कळवा पोस्टेगर नं. २४२/२०२२ भा.द.वि.क.३७९, ३४. ४) कोनगाव पो.स्टे.गु.र.नं. १७२/२०२२ भा.द.वि.क.३७९. ३४. ५) बाजारपेठ पो.स्टे. कल्याण पुर्व गुर.नं. १५३/२०२२ भा.द.वि.क. ३७९, ३४. ६) कोळशेवाडी पो.स्टे.गु.र.नं. T६४७/२०२१ भा.द.वि.क.३७९, ३४. ७) कोळशेवाडी पो.स्टे.गु.र.नं. १६७/२०२२ भा.द.वि.क. ३७९, ३४. ८) कोळशेवाडी पो स्टे गरम ३२१२०२२ भा.द.वि.क.३७९.
३४, ९) कळवा पो.स्टे.गु.र.नं. ३२५/२०२२ भा.द.वि.क.३७९ असे एकुण ०९ गुन्हे उघडकीस आणुन गुन्हयातील ५,३५,०००/– रु.कि.च्या ०५ ॲटो रिक्षा व ०४ मोटार साकयल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारे नमुद आरोपीत यांच्याकडून वाहन चोरीचे एकुण १० गुन्हे उघडकीस आणुन ५,८५,०००/- कि.मी मोटार सायकल, अॅटो रिक्षा अशी वाहने हस्तगत करून उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.
अशाप्रकारे कळवा पोलीस स्टेशन कडुन चैन स्नॅचिंग व वाहन चोरीचे एकुण १३ गुन्हे उघडकीस आणुन त्यामध्ये चोरीस गेलेला एकूण ६,९५,०००/-रु.कि.चा मुद्देमाल त्यामध्ये सोन्याचे दागिने, मोटार सायकल, ॲटो रिक्षा असा माल हस्तगत गुन्हे प्रकटीकरण पथकाने उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. पंजाबराव उगले सो, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे, मा. पोलीस उप आयुक्त, परि. – ०१ श्री. अविनाश अंबुरे साो, ठाणे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री विलास शिंदे सो, कळवा विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे करण्यात आलेली आहे.
