प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : एका व्यवहारात दिलेले 2 लाख 80 हजार रुपये परत करत नसल्याने रेल्वेत मॅकेनिक असलेल्या अजय जाधव याने 56 वर्षीय अतुल व्यापारी नावाच्या व्यक्तीला मारहाण करत त्याचे अपहरण करून 8 दिवस त्याने स्वतःच्या माटुंगा येथील रेल्वे कॉलनीतील घरात डांबून ठेवत त्यांच्या पत्नीकडे सुटकेसाठी 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली मध्ये घडला असून पत्नीच्या तक्रारीनंतर टिळक नगर पोलिसांनी सापळा रचून खंडणी मागणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडून अतुल यांची सुखरूप सुटका केली आहे .नवरा पाहिजेल तर पाच लाख दे.
डोंबिवलीत राहणारे अतुल व्यापारी हे बँकेतून कर्ज पास करून देणे, व्याजाने पैसे देने यांसारखे व्यवहार करतात. रेल्वे मध्ये मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या अजयने 2021 मध्ये अतुल यांच्यासोबत एक व्यवहार केला होता. त्यासाठी 2 लाख 80 हजार रुपये त्याने अतुलला दिले होते. मात्र पैसे परत देत नसल्याने अजय याने अतुल डोबिवलीत 9 जुलै रोजी भेटण्यासाठी बोलावत त्याला मारहाण करून त्याचे अपहरण करत त्यांना माटुंगा येथील रेल्वे वसाहतीतील घरात डांबून ठेवले. पुढे अतुल यांची पत्नी ऋचा यांच्या फोनवर नवरा हवा तर 5 लाख रुपये दे अशी मागणी केली. ऋचा यांनी 3 लाख रुपये देण्याची तयारी दाखविली मात्र अजय 5 लाखावर अडून बसल्याने अखेर शुक्रवारी तिने टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे, पोलीस नाईक जाधव, घुगे, महाजन, चंदने यांच्या पथकाने अतुल यांचा शोध सुरू केला. ऋचा यांनी 5 लाख घेण्यासाठी अजयला डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील एका हॉटेल मध्ये बोलावले. या हॉटेलात पोलिसांनी सापळा लावत खंडणीचे पैसे घेण्यात आलेल्या अजयला रंगेहात पकडून अतुलची सुटका केली. त्यानंतर पत्नीच्या व अतुलच्या फर्यादनंतर अजयला वेड्या ठोकत कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने अजयला 20 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहे .
