जनतेज न्युज

अमित ठाकरे यांनी शिव मंदिरात दुग्धअभिषेक करत संवाद यात्रेला केली सुरुवात

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : मनसेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे  यांचा आज उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर येथे संवाद दौरा आहे. या द्वारासाठी सर्वात प्रथम अमित ठाकरे यांनी  दादर ते अंबरनाथ असा लोकल प्रवास केला. रस्त्यावरील ट्रॅफिक आणि खड्ड्यामुळे त्यांनी हा लोकलचा प्रवास केल्याचे बोलले जात आहे. अंबरनाथ स्टेशनवर त्यांनी उतरून सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत वंदन केले नंतर अंबरनाथ मधील ऐतिहासिक शिव मंदिर येथे जाऊन कार्यकर्त्यांसोबत दर्शन घेत शिवलिंगाला दुधाचा अभिषेक करुन संवाद यात्रेला सुरुवात केली