जनतेज न्युज

आम्हाला गद्दार म्हणण्याचा कोणाला अधिकार नाही – आमदार उदय सामंत

प्रतिनिधी, रत्नागिरी : एकनाथ शिंदे यांना नक्षलवादी यांची धमकी असताना देखील शंभूराजे देसाई यांनी सुरक्षा का दिली नाही? याचे उत्तर शंभूराजे देसाई देऊ शकतात अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपाबाबत सामंत यांना विचारला असतात त्यावर ते बोलत होते. शिवाय आम्ही अद्याप देखील शिवसेनेतच आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. अशी प्रतिक्रिया देखील यावेळी उदय सामंत यांनी दिली. तसेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 200 ऐवजी 181 मतं कशी मिळाली?मुख्यमंत्र्यांवर बोलण्यापेक्षा सभागृहामध्ये  109 ची 98 मतं कशी झाली? याचा विचार करावा असा टोला देखील यावेळी उदय सामान त्यांनी महाविकास आघाडीला लागला आहे. आम्हाला गद्दार म्हणण्याचा कोणाला अधिकार नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही कोणतीही गद्दारी  शिवसेनेसोबत केलेली नाही.