जनतेज न्युज

जेव्हा तुम्ही नगरविकास मंत्री होतात तेव्हा मुंबई शहरातील खड्डे मुक्त का नाही केले ? – महेश तपासे

प्रतिनिधी, मुंबई : येत्या २ वर्षामध्ये मुंबई शहरातले  सर्व रस्ते खड्डे मुक्त करू अशी खोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागच्या महाविकास आघाडी मध्ये आपण  नगरविकास विभागाचे अडीच वर्ष मंत्री होतात.राज्यातले नगरपालिका ,महानगरपालिका हे सर्व आपल्या अधिपत्याखाली काम करत होते.त्या वेळेला मुंबई शहरातील खड्डे मुक्त का नाही केले ? हा प्रश्न मुंबई च्या नागरीकांच्या मनात निर्माण झालेला आहे.आज जेव्हा आपण घोषणा करतात याचा अर्थ असा आहे की , गेल्या अडीच वर्षामध्ये जेव्हा नगर विकास खात्याचे मंत्री होतात त्या कार्य काळामध्ये मुंबई च्या विकासाठी काहीच उपयोग झाला नाही का ? ही त्याची कबुली आहे का अशी विचारणा महाराष्ट्रातली जनता करत आहेत.