जनतेज न्युज

सकल हिंदू समाज माध्यमातून मूक मोर्चा

प्रतिनिधी, बीड : देशात हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये सकल हिंदू समाज माध्यमातून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. शहरातील बालाजी मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली तर सहयोग नगर येथील गणेश मंदिर परिसरात मोर्चाची सांगता करण्यात आलीय. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, झारखंड, कर्नाटक, दिल्ली या राज्यात हिंदूंची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर भावना व्यक्त करण्यास शब्द नाहीत. त्यामुळे काळ्या फिती बांधत मूक मोर्चा काढण्यात आला आहे.