प्रतिनिधी, बीड : कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक निधी मिळावा. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मराठा समाजातील तरुणांनी बैठक बोलावली. या बैठकीत तरुणांनी सहभाग नोंदविला 2018 नंतर या महामंडळाचा निधी ठप्प आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी निधी उपलब्ध होत नाहीये. आता नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारकडून मराठा समाजातील तरुणांच्या अपेक्षा वाढल्यात. शिंदे सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून नरेंद्र पाटील यांची महामंडळावर फेर निवड करावी अशी मागणी या बैठकीतून करण्यात आलीय.
