जनतेज न्युज

आत्महत्या करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची वन परिक्षेत्र अधिकार्यांेनी काढली समजूत

प्रतिनिधी, बुलडाणा : शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे नुकसान रोही हे वन्यप्राणी करीत आहे. दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे करा. रोह्यांचा बंदोबस्त करून तार कुंपण घालण्यात यावे या मागणीसाठी चिखली तालुक्यातील अंचरवाडी आणि वसंतनगर येथील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी वनपरिक्षेत्राधिकारी यांना निवेदन द्वारे मागणी केली होती मात्र निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज येथील शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता..मात्र आत्महत्या करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची वन परिक्षेत्र अधिकार्‍यांनी समजूत काढून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे व शेतकऱ्यांनी 10 टक्के भरून शेताला लागून असलेल्या जंगलाला तार कुंपण घालण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. तसेच पुढील काळात कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.