प्रतिनिधी, मुंबई : नवी मुंबईत सिडकोने भूखंड विक्रीचा धडाका लावला आहे. त्यानुसार सीवूड्स मधील सीआरझेड क्षेत्रात मोडणारा सुमारे २५,००० चौरस मीटरचा भूखंडाच्या विक्रीसाठी सिडकोने निविदा मागविल्या आहेत. या भूखंड विक्रीला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध दर्शविलाय. आपला विरोध दर्शविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी एनआरआय कॉम्प्लेक्स जवळ सिडकोच्या विरोधात निषेध रॅली काढली. या निषेध रॅलीला नवी मुंबई शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद भेटला. शहराची नैसर्गिक सुंदरता सिडकोने बिघडवू नये आणि भूखंड विक्रीचा घातलेला घाट रद्द करावा अशी मागणी यावेळी पर्यावरण प्रेमींनी केले आहे .
