प्रतिनिधी , बीड : भारत स्वातंत्र्याच्या लढ्याला 75 वर्ष पुर्ण होत असल्याने संपूर्ण देशभरामध्ये आजादी चा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. यानिमित्ताने देशभरात विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहे.गेवराई येथील र.भ.अट्टल महाविद्यालय व गेवराई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सुरक्षा व सायबर गुन्ह्यांविषयी जानजागृती कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी महाविद्यालयीन तरुण तरुणींना गुन्हे कसे घडतात, गुन्हे घडु नये म्हणुन काय काळजी घ्यावी , गुन्हे दाखल झाल्यानंतर काय परिस्थिती ओढावते याविषयी मार्गदर्शन केले.तर उपस्थित विद्यार्थ्यांनीही केलेल्या मार्गदर्शनाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल तसेच भविष्यात आमच्या हातुन गुन्हे घडणार नाहीत यासाठी आम्ही सावधान राहुत अशी प्रतिक्रिया दिलीये.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार, सहायक पोलिस निरीक्षक संदिप काळे,जंजाळ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर रजनी शिखरे,उप प्राचार्य मेजर विजय सांगळे,प्रशांत पांगरीकर,राजेंद्र राऊत प्राध्यापक समाधान इंगळे,शरद सदाफुले यांच्या सह महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
