जनतेज न्युज

श्रीरंग विद्यालयामध्ये हजारो दिवे लावून दीप अमावस्या साजरी करण्यात आली

प्रतिनिधी , ठाणे : श्रावण महिना सुरू होण्याच्या आदी आषाढ महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते या अमावस्येला सर्वत्र घरांमध्ये दिवे लावले जातात व लहान मुलांना औक्षण देखील केले जाते ठाण्यातील श्रीरंग विद्यालयामध्ये गेल्या सहा वर्षापासून आषाढी अमावस्येला दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही शाळेमध्ये हजारो दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी स्वस्तिक ओम शंख अशा विविध प्रकारचे रांगोळ्या काढून त्या भोवती विद्यार्थ्यांनी दीप प्रज्वलित केले होते अशा पद्धतीने शिक्षक विद्यार्थी यांनी एकत्र येऊन दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली