जनतेज न्युज

माजी मंत्री अर्जुन खोतकर शिंदे गटात सामिल

प्रतिनिधी, जालना : मराठवाड्यात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.. शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला. मागच्या आठ दिवसांपासून खोतकर दिल्लीत तळ ठोकून होते. त्यानंतर ते काल जालन्यात दाखल झाले.आज त्यांनी त्यांनी आपली भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन केले आहे. शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटाला पाठिंबा.जालन्यातल्या पत्रकार परिषदेत सहकुटुंब खोतकर भावूक.ईडीच्या कारवाईमुळं शिंदे गटात जात असल्याचं खोतकर यांचं म्हणणं .सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलून खोतकरांनी निर्णय घेतला.कारखाना सुरु करण्याच्या घोषणेपासून ईडीची कारवाई सुरु झाली.आजपासून अर्जुन खोतकर शिंदे गटात सामिल. या घोषणेवेळी खोतकर यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. ईडीच्या कारवाईमुळं माझ्यावर संकट आले आहे. त्यामुळं मी दडपनाखाली असून त्यामुळंच हा निर्णय घेत असल्याचं खोतकर यांनी सांगितले.हा निर्णय घेण्याआधी ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीफोनवर बोलले असल्याचं त्यांनी सांगिलते.