जनतेज न्युज

राज्यपाल महोदयांचे वक्तव्य महाराष्ट्र द्रोही – ॲड. यशोमती ठाकूर

प्रतिनिधी, मुंबई : सातत्याने कुरघोडी करण्याची सवय असलेल्या या महोदयांची लवकरात लवकर पाठवणी करावी, अशी मागणी माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून येथे जगभरातील जनता आनंदाने नांदते आहे. संकटकाळात एकमेकांच्या मदतीला धावते. त्यामुळे ज्या व्यक्तीला महाराष्ट्राबद्दल आपुलकी, प्रेम नाही ती व्यक्ति त्या राज्याचे भले कसे काय करणार असा प्रश्न माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर उपस्थित केला आहे.