जनतेज न्युज

मराठी आणि अमराठीमध्ये राज्यपालांनी वाद घडवू नये- संजय गायकवाड

प्रतिनिधी, बुलढाणा : राज्यपाल हे घटनात्मक पद आहे आणि त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने राज्यांमध्ये कुठेही समाजात तेढ निर्माण होईल किंवा अशा प्रकारचं वक्तव्य करणे अतिशय बेजबाबदार पणाच आहे.मुंबईमध्ये जे काही राजस्थानी,गुजराती मारवाडी हे परराज्यातून आली.त्यावेळी ते खाली हात आली. या लोकाना रोजगार दिला व्यवसाय दिला समृद्ध केले.मुंबई ही मराठी माणसाचा आत्मा आहे.या करता 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. अशा प्रकारे वक्तव्य करून एक तर मराठी आणि अमराठीमध्ये राज्यपालांनी अशा प्रकारचा वाद घडवू नये. मुंबई अनेकांच्या त्यागातून परिश्रमातून घामातून त्या ठिकाणी उभी आहे आणि राज्याची आर्थिक नाळ ती आहे.