प्रतिनिधी, अकोला : अकोला : राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक झाली असून.काळी टोपी सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करत आलेली असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर केला आहे. तर राज्यपालांनी महाराष्ट्राची व मराठी मानसाची माफी मागावी अन्यथा युवक काँग्रेस आंदोलना द्वारे निषेध करुण माफी मागायला भाग पाडेल.असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.राज्यपालांनी सुत्र हाती घेतल्यापासुन सतत महाराष्ट्राचे अपमानास्पद वक्तव्य करत आहेत. राज्यपाल हे राहतात महाराष्ट्रात. राजवैभव आणि सुखसुविधा सुध्दा महाराष्ट्राच्याच उपभोगतात आणि गोडवे मात्र गुजरातचे गातात. हे महाराष्ट्रात राहुन चालणार नाही. राज्यपाल यांच्या डोक्यावरची काळी टोपी आणि डोक्यामध्ये असलेली काळी टोपी आणि खाकी चड्डीची विचारधारणा ही महाराष्ट्राची द्रोवाची आहे. महाराष्ट्राचा अपमान करणारी आहे.
