जनतेज न्युज

राज्यपालांनी पुन्हा असे विधान केल्यास, पदाचा मान राखला जाणार नाही – गजानन काळे प्रवक्ते, मनसे

प्रतिनिधी, मुंबई : राज्यपाल भगत सिंग कोष्यारी यांनी मुंबई बाबत केलेल्या अपमानकारक विधानाचे सर्वच स्तरातून निषेध होत आहे,मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनीही भगत सिंग कोष्यारी यांच्या विधानावर जोरदार टीका करताना,आपल्याला राज्याचा इतिहास माहीत नाही,मागे सावित्री बाई फुले यांच्या बद्दल केलेले विधान आणि आता मुंबई बाबत केलेले विधान पाहता,राज्यपालांना उत्तराखंडला पाठविण्याची वेळ आली असून,यापुढे जर अशा प्रकारचे विधान केले,तर पदाची गणीमा न राखली जाणार नसल्याची प्रतिक्रिया काळे यांनी दिली..