प्रतिनिधी, यवतमाळ : विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे यवतमाळ जिल्ह्यात सतत पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसानीची पाहणी करण्यात आले असता उमरखेड येथे धावती भेट देऊन कार्यकर्त्यांना संवाद साधला तसेच नांदेड दिशेने रवाना झाले उमरखेड राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय येथे पदाधिकारी यांनी शहरालगत असलेले बायपास चे रखडलेले काम तसेच विविध मागण्यासाठी निवेदन दिले या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर, राजू भैया जयस्वाल, युसुफ सौदागर, शंकर तालंकर ,मिथिलेश जयस्वाल ,जाकिर राज ,गुणवंत सूर्यवंशी, बबलू जाधव, गोविंद हेलगंडे अधिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित.
