प्रतिनिधी, बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव इथल्या शिंदेवाडीचा मागील 22 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित आहे. परिणामी ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतायत, पाणी असून देखील ग्रामस्थांना पिण्यास पाणी मिळत नाही तर जनावरांचे देखील हाल होऊ लागलेत. शिंदेवाडी गावातील विद्युत मंडळाची 90% बिल वसुली असताना देखील गावाला नवीन ट्रान्सफॉर्मर मिळालेला नाही. जे आहे त्याची दुरावस्था झालीय. त्यामुळे ग्रामस्थांनी तेलगाव येथील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली. जोपर्यंत गावचा विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय.
