प्रतिनिधी, बुलढाणा : राज्यपाल हे संविधानिक पद आहे..घटनेप्रमाणे निपक्ष काम करून लोकशाहीची गरीमा वाढवणे हे त्यांच्याकडनं अपेक्षित आहे.. परंतु या राज्यपालांनी गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने लोकशाहीची हत्या करण्याचे कृत्य केलेला आहे.एवढंच काय तर महाराष्ट्राचे जे स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले महापुरुषांचा पदोपदी अपमान त्यांनी केलेला आहे.ते फक्त राजकीय स्वार्थासाठीच पदाचा उपयोग करत नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान करण्याचं काम त्या पदाच्या माध्यमातून करत आहे.. त्यांनी महाराष्ट्रातील तमाम 13 कोटी जनतेला कमी लेखण्याचं काम त्यांच्या या कृत्यातून झालेले आहे.मी सन्माननीय राष्ट्रपती देशाचे सन्माननीय पंतप्रधान यांना अशी विनंती करतोय की अशा व्यक्तीला तत्काळ आपण त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी.. ही मी विनंती करतो.. अशी मागणी त्यांनी माननीय राष्ट्रपती व पंतप्रधान यांना केली आहे..
